ओवा
लागवड
ह्या पीकाची लागवड आक्टोंबरच्या शेवटच्या आठवड्यापासुन नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये करतात. २ ते २.५ किलो प्रती हेक्टरी बी वापरावे.
दोन ओळीतील अंतर ३० सेमी तर दोन झाडातील अंतर ४५ सेमी ठेवावे.
खत व्यवस्थापन
खतांचे डोस माती परीक्षणानुसार व जमिनीनुसार द्यावेत. सर्वसाधारण २० किलो नत्र व २० किलो स्फुरद प्रती हेक्टरी पेरणीच्या वेळी तसेच २० किलो नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी वापरावे. तण नियंत्रणासाठी फ्लुक्लोरँलीन ९०० ग्रम प्रती हेक्टरी या तणनाशकाची तण व पीक उगवण्यापुर्वी फवारणी करावी.
ओवा ही पीक दोन महिन्यांमध्ये फुलधारणा करते आणी फळाचे तोंड विटकरी रंगाचे झाल्यानंतर तोडणीस योग्य आहे असे समजावे. अशी फळे तोडुन चटई किंवा चादरी वर वाळवावीत व हाताने किंवा पायाने घासुन बी वेगळे करावे.
ओवा हे पीक प्रामुख्याने उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश व काही प्रमाणात महाराष्ट्रामध्ये घेतले जाते.