जमीन
या पिकास मध्यम ते भारी खोल, पाण्याचा निचरा आवश्यक, थोडी चोपन जमीन चालते.
लागवड
*लागवड १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान योग्य.
* यास हिवाळा मानवतो मात्र पक्व होताना उष्ण, कोरडे हवामान चांगले.
*करडई स्वतंत्र पेरल्यास दोन ओळीतील अंतर ४५ X २० सेमी.ठेवावे तर यास अंतर पिक, मिश्र पिक म्हणूनही पेरतात. शाळू ज्वारीत दर २५ फुटावर पट्टा, तसेच हरभरा करडई,जवस करडई मिश्र पिक घेतल्यास अधिक उत्पन्न मिळते.
बियाणे / वाण
*सुधारित वाण डी एस एच -१२९, बिनाकाट्याचे वाण नारी - ६, नारी एन एच १ आहेत. कोरडवाहूसाठी भीमा, फुले कुसुमा हे वाण आहेत.
बिजप्रक्रिया
*पेरणी पूर्वी बियान्यास बुरशीनाशक आणि अझोटोबेक्टर चोळावे.
खत व्यवस्थापन
एकरी ३ टन शेणखत शिवाय ५० किलो नत्र,५० किलो सुपर फोस्फेट आणि २५ किलो म्युरेट ऑफ पोटाश, पेरणी करताना द्यावे.
पाणी व्यवस्थापन
*या पिकास पेरताना,३० दिवसांनी आणि ६० दिवसांनी असे ३ पाणी आवश्यक आहेत.
कीड नियंत्रण
* यात सगळ्यात मोठी अड़चन मावा अधिक येतो त्यासाठी पेरणी नंतर प्रादुर्भाव होण्या पूर्वी निंबोळी अर्काची फवारनी करावी, प्रादुर्भाव आढळल्यास क्लोरोपायरीफोस + कॉपर ऑक्सिकलोराइड दोन तीन वेळा फवारावे.
*साधारणपणे १३० दिवसांनी पीक पक्व होते. पाने आणि बोंडे पिवळी पडू लागल्यावर बुडापासून कापणी करावी,खळ्यावर वाळवून मळणी करावी.*कोरडवाहूमध्ये एकरी ५ ते ६ क्विंटल आणि बागायतमध्ये एकरी ८ ते १० क्विंटल उत्पन्न मिळू शकते.