शेवंती
शेवंती लागवडीस हलकी ते मध्यम प्रतीची जमीन निवडावी .जमिनीचा सामू 6.5 ते 7 दरम्यान असावा.
लागणीची पद्धत
शेवंतीची लागवडीस 10 ते 15 सेंमी लांबीच्या सकर्सच्या तुकड्यांचा वापर करावा .जाती नुसार 60 सेंमी अंतर सऱ्या पाडाव्या किंवा 3×2 आकाराचे सपाट वाफे तयार करून 30×20 सेंटीमीटर ठेवुण लागवड करावी .
बीज प्रक्रिया -
लागनीपूर्वी बोर्डो मिश्रण किंवा बविस्टिनच्या द्रावनात बुडुन बीज प्रक्रिया करा.जर लागवडीस शेंडा कलम किंवा खोड कलम अवलंबल्या स बेने 2-3 पाने असलेले कलम कांडी बुरशीनाशकात बुडविले नंतर IBA 1000 ppm या संजीवकात बुडुन लागवड करावी .
ट्राइकोडर्मा विरडी 250 ग्रॅम 10 किलो शेणखतासोबत पिकाच्या सुरवातीच्या काळात ओळींमध्ये टाकल्याने मातीतून येणा-या रोगांचे व तसेच बुरशीजन्य रोगांमुळे येणा-या मर रोगापासून पिकाचे रक्षण होवू शकते.
पाणी व ख़त व्यवस्थापन
पडवळ पिकास करीता पेरणी पूर्वी प्रति हे. 40टन शेनखत द्यावे .लागवड करताना प्रति हे 200 किलो प्रमाणे , स्फूरद ,पालाश द्यावे .आणी नत्र पहिला हप्ता 15दिवसानी 100किलो व दुसरा नत्राचा हप्ता 45 दिवसांनी 100 -किलो मात्रा द्यावी .
जमिनीच्या मगदुराने 4-5 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे.
वळन आणी छाटनी - लागवडी नंतर 3-4 आठवड्यानी 10 सेंमी शेंडा खुडावा यालाच पिचिंग असे म्हणतात
लागवडीस उपयुक्त जाती - झिप्री ,राजा ,पांढरी रेवडी ,पिवळी रेवडी ,सोनाली तारा ,आय .आय . एच .आर . सीलेक्शन -4, बग्गी ,शरद माला जाती वापरावि.
किड नियंत्रण
1) मावा - पिकाच्या कोवळ्या पानातून रस शोषून घेते खाते नियंत्रना करीता 10 लिटर पाण्यात किंवा मॅलॅथिऑन 15 मिली ची फवारनी करावी .
2) फुलकिडे - कळी आणी पानातीला रस शोषून घेते मॅलेथियॉन (50%प्रवाहि)10- मिली 10 लिटर पाण्यात फुले येण्यापूर्वी 1ते 2 वेळा फवारावेत .
3)पाने खाणारी आळी -पिकावरील सर्व पाने खाऊन टाकते नियंत्रण करीता 12 मिली इकॅलकस (35%प्रवाहि)किंवा थायोडॉन (35%प्रवाहि) ची फवारनी करावी .
4) लाल कोळी - पानांच्या खालून रस शोषण करतात. नियंत्रण -30ग्रॅम पाण्यात विरघळणारे गंधक अथवा 10 मिली केलथेन 10 लिटर पाण्यात मिसळून फवरावे .
रोग नियंत्रण
1)खोड कुज - खोड काळे पडून पाने सुकतात
नियंत्रण - बाव्हिस्टीन20ग्रॅम किंवा कॅप्टन 20 ग्राम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
2) पानावरील ठिबके -पानावर गोल ठिबके पडतात नियंत्रण करीता 10 लिटर पाण्यात 26ग्रॅम डायथेन - एम -45 डायथेन झेड -78 हे बुरशी नाशक फवारावे .
3)रोपांची मर -रोप तपकिरी रंगाचे पडून पाने सुकतात व कालांतराने रोप मरते नियंत्रण करीता डायथेन एम- 45 0.2% द्रावणात रोप बुडून लागवड करावी.
4) मूळकुज -अतिरिक्त पानी साचल्याणे रोप मरते नियंत्रणा करीता रोपाच्य मुळाजवळ 25 ग्रॅम थायरम (80%)10 लिटर पाण्यात मिसळून फवारवे .
5) भूरि - रोपावर पांढऱ्या रंगाचे डाग पडतात नियंत्रण -10 लिटर पाण्यात 6ग्रॅम कॅरथेन किंवा 10 ग्रॅम बविस्टिन फवारवे .
6)तांबेरा -पानावर वीटकरी रंगाचे ठिबके पडतात व फुले कमी येतात नियंत्रणकरीता 30 ग्रॅम डायथेन एम -45 10 लिटर पाण्यातून फवारवे .
महत्वाची घ्यावयाची काळजी
फुलांची काढनी कोवळी असतांनच सकाळच्या वेळी करावी. काढनि नंतर फुले थंड ठिकाणी ठेऊन लवकरात लवकर प्रतवारी करून पॅकिंग करून बाजारपेठेत विक्रीस पाठवावे.