दोडके (तुराई ) लागवड
जमीन:
मध्यम भारी,पोयट्याची,पाण्याचा उत्तम निचरा होणारी असावी.
तापमान २० ते ३५ सेल्सियस दरम्यान हवामान – समशीतोष्ण मानवते.
लागवड
कालावधी जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान चालते.
पूर्व मशागत करताना नांगरणी,दोन वेळा वखरणी करावी.
पुसा नसदार,देशी,चैताली,को-१,कोकण हरिता,फुले-सुचेता इत्यादि शिफारसीत वाणचे एकरी २ किलो बियाणे वापरावे.
लागवड पद्धत -
दोन ओळीत २ अंतर,दीड मीटर अंतरावर २ बाय २ फुटाचे खड्डे करून माती शेणखताने भरावे. एका ठिकाणी २/३ बिया पेराव्या. मांडव उभारणे आवश्यक आहे.
खत व्यवस्थापन:
शेवटच्या पाळी पूर्वी एकरी २ टन शेणखत टाकून पाळी द्यावी.लागवड करताना एकरी २५ किलो नत्र,३० किलो स्फुरद ,५० किलो पालश एक महिन्याने २५ किलो नत्राचा दुसरा हप्ता द्यावा.
या सोबतच लागवड केल्यास २ दिवसांनी १२:६१:० खत १.५ किलो + युरिया २ किलो ड्रेंचिंग करा.
हिरवी वाढ व्यवस्थित झाल्यास १९:१९:१९ खताची २ किलो + युरिया २ किलो ड्रेंचिंग करा.
फूल लागवड कालावधीत व पहिल्या तोडणी अगोदर १२:६१:० ची २.५ किलो + १३:०:४५ ची २ किलो + कॅल्शियम नायट्रेट ०.५ किलो ड्रेंचिंग करा.
दुसर्या किंवा त्या पुढील तोडणीच्या वेळी १३:०:४५ ची ३ किलो ड्रेंचिंग करा.
पाणी व्यवस्थापन :
५०% वापसा अवस्था राहील असे ठिबकद्वारे दर ४ ते ५ दिवसांनी पाणी पाळी द्यावी.
कीड व रोग नियंत्रण -
नाग अळी
नियंत्रणासाठी अबामेक्टिन ४ मिली १० लीटर पाण्यातून किंवा डाइफेनथियौरॉन २० ग्रॅम किंवा स्पीरोमेसिफेन १८ मिली किंवा अॅसिफेट +इमीडाक्लोप्रिड ५० ग्रॅम किंवा फ्लोनीकॅमिड ६ मिली प्रति १५ लीटर पाण्यातून फवारा.
अंकुर आणि मुळे खाणारी अळी
पिकाचे मातीपासून मुळाचे व खोडाचे नुकसान करते प्रतिबंध करण्यासाठी कार्बोफ्युरान ३जी १२ किलो प्रती एकर सरीत टाका.उभ्या पिकातील नियंत्रणासाठी फिप्रॉनिल ५%एस सी ५०० मिली किंवा क्लोरपायरीफॉस २० ई सी ड्रेंचिंग करा किंवा फिप्रोनील + इमीडाक्लोप्रिड ८० डब्ल्यू जी १५० मिली प्रति २५० लीटर पाण्यातून प्रती एकर भिजवणी करा.
फळ माशी
नियंत्रणासाठी इंडोक्साकार्ब १४.५ एस सी ५ मिली + स्प्रेडिंग एजेंट ६मिली १० लीटर पाण्यातून फवारा किंवा फिप्रोनिल ५ एस सी ३० मिली प्रति १५ लीटर पानी किंवा लॅंब्डा सायहॅलोथ्रिन ५ मिली प्रति १० लीटर पानी ची फवारणी करा.
पांढरी माशी
पिकात मोझाईक व्हायरस पसरवते. पांढरी माशी दिसून येताच नियंत्रणासाठी डाइफेनथियौरॉन ५० डब्ल्यू पी २०ग्रॅम किंवा स्पीरोमेसिफेन १८ मिली किंवा अॅसिफेट ५०%+इमीडाक्लोप्रिड ५० ग्रॅम किंवा फ्लोनीकॅमिड ६ मिली प्रति १५ लीटर पाण्यातून फवारा.
डाऊनी/केवडा -
नियंत्रणासाठी बिटरटेनोल २५ डब्ल्यू पी ३० ग्रॅम प्रति १५ लीटर पानी किंवा क्लोरोथॅलोनील ७५ डब्ल्यू पी ३० ग्रॅम प्रति १५ लीटर पानी किंवा टेब्युकोनॅझोल २५ मिली प्रती १५ लीटर पानी किंवा कार्बनडॅझिम १२%+ मॅनकोझेब ३० ग्रॅम प्रति १५ लीटर पाण्यातून फवारा.
भूरी रोग
पानांवर पांढरी पावडर दिसून येते.प्रतिबंध करण्यासाठी गंधक पावडर १० किलो प्रति एकर सकाळी पानांवर दव असताना द्या.प्रभावी नियंत्रणासाठी क्लोरोथॅलोनील ७५ डब्ल्यू पी ३० ग्रॅम प्रति १५ लीटर पानी किंवा टेब्युकोनॅझोल १ मिली प्रति लीटर पानी किंवा कार्बनडॅझिम+ मॅनकोझेब २ ग्रॅम प्रति लीटर पाण्यातून फवारा.
* पाना फळांवरील ठिपके रोगात सुरवातीच्या काळात पानांवर पाण्याने भरलेले डाग दिसून येतात.या ठिपक्यांमध्ये मध्यभागी पांढरा आणि काठावरुन राखाडी रंग दिसून येतो.प्रभावी नियंत्रणासाठी भूरी प्रमाणे नियंत्रण करा.
तण नियंत्रण करण्यासाठी पेंडीमेथलीन १.२५ लीटर प्रती २०० लीटर पाण्यामध्ये मिसळून पेरणीनंतर ४८ तासांच्या आत जमीन ओलसर असताना ऐका एकरात फवारा. तसेच बियाणांची उगवण झाल्यावर १० ते १५ दिवसांनी एक व फुले येण्यापूर्वी १-२ वेळा अंतर मशागत करणे गरजेचे आहे.
* ६० दिवसानंतर फळे काढणीस येतात. उत्पादन एकरी ४ ते ५ टन मिळू शकते.