Search here..

Saturday, February 24, 2018

शेळी चारा व्यवस्थापन

भारतात शेळयांच्या प्रमुख 25 जाती आढळतात. शेळ्यांचा व्यावसायिक उपयोग करून दुध उत्पादन, लोकर / मोहर उत्पादन, मांस उत्पादन करता येते. दोन शेळ्या एका छोट्या कुटुंबाचा सक्षम उपजीविकेचा आधार बनू शकतात. शेळीच्या जाती निवड आणि जोपासना अधिक वाचा...

शेळी पालनामध्ये गोठा पद्धतीला महत्व आहे. कमीत कमी खर्चात व्यवस्थित संगोपन केल्यास जास्तीत जास्त नफा राहतो. शेळीच्या निवासावरून मुक्त, अर्धबंदिस्त आणि बंदिस्त असे शेळी पालनाचे प्रकार पडतात. गोठा पद्धतीबाबत अधिक वाचा...

साधारणपणे शेळ्यांना दररोज तीन ते चार किलो हिरवा चारा व एक किलो वाळलेला चारा लागतो. त्याचप्रमाणे शेळ्यांच्या खाद्यामध्ये झाडपाला आवश्यक आहे. त्याचबरोबर गाभण शेळी, दूध देणारी शेळी, पैदाशीच्या बोकडासाठी पूरक आहाराची आवश्यकता असते. 

शेळीपालनमध्ये चारा नियोजन

बंदिस्त शेळीपालनासाठी चाऱ्याचे वार्षिक नियोजन करणे आवश्यक आहे. कडवळ, गजराज, बरसीम, लसूणघास, मका इ. एकदल व द्विदल पिकांची लागवड करावी. त्याचप्रमाणे वाळलेल्या चाऱ्याकरिता कडबा, गहू, सोयाबीन, तांदळाचा कोंडा, उडदाच्या भुश्याय चा वापर करावा.

खाद्य प्रमाण : शेळीला दिवसाकाठी ३ ते ४ किलो ओला चारा व दीड ते दोन किलो सुका चारा द्यावा. शेळ्यांना प्रथिनयुक्त ल्यूसर्न,बरसीम, चवळी असा चारा द्यावा. मका, ज्वारी, बाजरी, ओट, नाचणी व त्यांचे कोंडा द्यावा त्यासोबत शेंगदाण, तीळ, सरकी सरकी, सोयाबीन, सूर्यफूल, खोबरे, करडई यांच्या पेंढि द्याव्यात. गाभण काळात शेवटी ३० दिवसात ४०० ते ५०० ग्रॅम खाद्य द्यावे.

लहान करडांचा चारा व खाद्य प्रमाण :
सुरवातीचा आठवडा चीक आणि दूध द्यावे. नंतर ओल्या व सुक्या गवतांचा तसेच झाडा झुडूपांच्या पाल्याचा चारा द्यावा. शेळ्यांना शेवरी, सुबाभूळ, पकार, पिंपळ, बेल, ओक, लिंबोळी, करवंद अश्या काटेरी झाडांचा पाला टांगून द्यावा. करडे १.५ ते २ महिन्यांची झाल्यावर दूध पाजने बंद करावे. याच काळात आंबवण व ओला चारा वाढवत जावे. चार महिन्यानंतर मटणासाठी विकण्यापर्यंत वैरणीशिवाय २५० ते ३०० ग्रॅम आंबवण द्यावे.

पैदाशीसाठी बोकडाचा चारा व खाद्य प्रमाण : 
चाऱ्यासह ५०० ते ८०० ग्रॅम प्रति दिन (त्याच्या वजनानुसार) खाद्य देणे आवश्यक आहे.

10 शेळी पालन युनिटसाठी चारा व्यवस्थापन कसे करावे ?
  • मौसमी चारा (हंगामी चारा) - ज्वारी (Sorghum), मका (Maize), नेपियर गवत (Napier Grass), लसूण गवत (Lucerne)
  • बहुवर्षीय चारा (पुनःपुन्हा उगवणारा) - नेपियर-को-4 किंवा को-5 (Hybrid Napier), सुबाभूळ (Subabul), ग्लिरिसिडिया (Gliricidia)
  • झाडे व झुडपे - ड्रमस्टिक (शेवगा), सुबाभूळ आणि लुसर्न यांचा एकत्रित वापर.
किती जमीन आवश्यक आहे?
  • 10 शेळ्यांसाठी चारा लागवडीसाठी अंदाजे 0.5 ते 1 एकर जमीन पुरेशी आहे.
  • नेपियर गवत: 1 गुंठ्यात (0.025 एकर) सुमारे 8-10 शेळ्यांसाठी पुरेसा चारा मिळतो.
  • लसूण गवत: एका एकरात लागवड केल्यास वर्षभर पुरेसा चारा मिळतो.
सतत (वर्षभर) चारा पुरवठा कसा करावा?
1. चारा लागवडीचे नियोजन
  • पिकांचे चक्र: मौसमी चारा (ज्वारी, मका) आणि बहुवर्षीय चारा (नेपियर) यांचा एकत्रित वापर करा.
  • हंगामानुसार लागवड: उन्हाळ्यात मका, पावसाळ्यात ज्वारी, तर वर्षभरासाठी नेपियर लावा.

2. चाऱ्याची साठवणूक
  • सिलेज तयार करा: ज्वारी किंवा मक्याचा चारा साठवून ठेवा.
  • कडबा / हाय (Dry fodder): ज्वारी व गव्हाच्या काड्याचा वापर करा.
3. पुनर्लागवड आणि व्यवस्थापन
  • नेपियर गवताची लागवड 2-3 महिन्यांच्या अंतराने वेगवेगळ्या भागात करा, जेणेकरून सतत नवीन चारा उपलब्ध होईल.
  • बहुवर्षीय चाऱ्याचे पीक घेण्यासाठी नियमित पाणी व खत व्यवस्थापन करा.
4. अतिरिक्त चारा पिके - 
  • सुबाभूळ आणि शेवगा: यांचा वापर प्रथिनयुक्त चाऱ्यासाठी करा.
  • ग्लिरिसिडिया: याचा पाला प्रथिनयुक्त असल्याने उपयुक्त ठरतो.
उत्तम चारा व्यवस्थापनासाठी टिप्स
  • सिंचनाची सुविधा: वर्षभर चारा पिकासाठी ठिबक सिंचनाचा वापर करा.
  • सेंद्रिय खतांचा वापर: चाऱ्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी शेणखत आणि जैविक खतांचा वापर करा.
  • रोटेशनल ग्रेजिंग: शेळ्यांना एका ठिकाणी जास्त वेळ चरायला न देणे.
  • चाऱ्याची विविधता: प्रथिनयुक्त व फायबरयुक्त चाऱ्यांचे संतुलित प्रमाण ठेवा.
सरकारच्या योजना आणि मदत
  • राष्ट्रीय पशुधन अभियान: चारा उत्पादनासाठी अनुदान.
  • सेंद्रिय व चारा बियाणे वितरण योजना: कमी दरात बियाणे उपलब्ध.
सतत चारा पुरवठा करण्यासाठी नियोजनबद्ध लागवड, योग्य व्यवस्थापन, आणि चाऱ्याच्या विविध प्रकारांचा वापर केल्यास 10 शेळ्यांसाठी चारा पुरवठा सुनिश्चित होईल.

वाढते तापमान आणि कमी पर्जन्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष या बदलत्या हवामानाचा शेळ्या- मेंढ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. सर्वसाधारणपणे शेळ्या- मेंढ्यांचा पैदासकाळ हा पावसाळ्याच्या सुरवातीला येतो; मात्र पैदाशीसाठी सक्षम शरीर यंत्रणा तयार होण्यासाठी उन्हाळी हंगामातच त्यांची काळजी कशी घ्यायची अधिक वाचा... 

शेळी ही निसर्गतः काटक व रोगांना कमी बळी पडते; मात्र अनेक कारणांमुळे विविध रोगांचे संक्रमण होऊन शेळीपालन व्यवसायाचे व्यवस्थापन बिघडण्याची दाट शक्यनता असते. शेळी संगोपानामध्ये आरोग्य व्यवस्थापन अधिक वाचा...

माझीशेती मार्फत शेलीपालनाचे संपुर्ण व्यवसाय शोध अहवालापासून मांस प्रक्रिया व निर्यातीबाबत सविस्तर ३ दिवस दररोज २ सत्रांमध्ये प्रशिक्षण दिले जाते. तज्ञ मार्गदर्शक, देशी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची सफर असा प्रशिक्षणाचा भाग आहे. प्रशिक्षणाबाबत अधिक वाचा... 




गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी तुम्ही हातभार लावा. प्रकल्प अहवाल बनवुन घ्या. तुम्ही दिलेला निधी गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरला जातो. आमच्या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्या. 

माझीशेतीच्या शेळी पालन ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

उपजिविका विकास अंतर्गत 'शेळी पालन' लाभ दिलेले लाभार्थी शेलीसह...
उपजिविका विकास अंतर्गत 'शेळी पालन' लाभ दिलेले लाभार्थी शेलीसह...