भारतात शेळयांच्या प्रमुख 25 जाती आढळतात. शेळ्यांचा व्यावसायिक उपयोग करून दुध उत्पादन, लोकर / मोहर उत्पादन, मांस उत्पादन करता येते. दोन शेळ्या एका छोट्या कुटुंबाचा सक्षम उपजीविकेचा आधार बनू शकतात. शेळीच्या जाती निवड आणि जोपासना अधिक वाचा...
शेळी पालनामध्ये गोठा पद्धतीला महत्व
शेळी पालनामध्ये गोठा पद्धतीला महत्व आहे. कमीत कमी खर्चात व्यवस्थित संगोपन केल्यास जास्तीत जास्त नफा राहतो. शेळीच्या निवासावरून मुक्त, अर्धबंदिस्त आणि बंदिस्त असे शेळी पालनाचे प्रकार पडतात. गोठा पद्धतीबाबत अधिक वाचा...
शेळीला निवा-यासंदर्भात महत्वाच्या गोष्टी:-
- शेळीला निवा-यामध्ये ऊन,थंडी,पाऊसापासून संरक्षण होणे आवश्यक आहे.
- शेळीचा निवारा शेळीस पूरेशी जागा ऊपलब्ध करणारा असावा,शेळीला मोकळी हवा व जागा मिळावी..
- निवा-याची जागा राहत्या घरापासून दूर व उंचवटयावर असावी.तसेच निवारा फार खर्चिक नसावा.निवा-यातील जमीनीवर ३ अंशाचा प्रत्येक फूटास उतार ठेवावा व त्यावर मूरूम पसरून नीट धूमसून[चोपून] त्यात ३% कळीचा चूना मिसळावा व मूरूम पून्हा चोपून घ्यावा.
- वयोगटानूसार व शारीरीक अवस्थेनूसार शेळयाचे गट करावेत उदा- दूध देणा-या शेळया,०-३ महिन्याची पिले,३-६ महिन्यांची मादी पिले,३-६ महिन्यांची नर पिले,६ महिन्यांच्या पूढील ते १ वर्षाची मादी पिले ,१ वर्षापूढील व मोठया खाटया[भाकड शेळया],गाभण शेळया,बोकड व आजारी जनावरे इ.चे गट करावेत म्हणजे अशी जनावरे गोठयात वेगवेगळी/ स्वतंत्र ठेवावीत.
- निवा-यात छप्पर असलेला व मोकळा भाग असावा.छप्पर असलेल्या भागात गव्हाण व पिण्याच्या पाण्याची टाकी असावी.गव्हाणीची रूंदी १-१.२५ फूट,उंची १.५ फूट [गव्हाणीचा तळ],व लांबी दर शेळीस १ फूट एवढी असावी.
- गोठयाची उंची मध्यभागी १२ फूट व व कडेला ८ फूट असावी व दिशा उत्तर -दक्षिण असावी.शेडची रूंदी ३० फूट व दोन्हीकडे मोकळा परंतू चेनलिंक जाळीचा भाग १५ फुट असावा.कडेची जाळी ६ फूट उंच,व मधील विभागातील जाळी ५ फूट उंच असावी.
मुक्त गोठा पद्धत
या शेळीपालनात शेळ्या दिवसभर चरण्यासाठी सोडल्यामुळे अतिरिक्त आहाराची तितकीशी आवश्यकता भासत नाही. परंतु शेळयांची चरण्याची पध्दत इतर गुरांप्रमाणे म्हणजे गाय, म्हैस मेंढी, यापेक्षा वेगळी असून त्या प्रत्येक झाडाचे झुडपाचे कोवळे शेंडे खातात त्यामुळे झाडांची वाढ खुंटते या प्राण्यामुळे जंगलांचा -हास होत आहे त्यामुळे हि पद्धतीची आम्ही शिफारस करत नाही. शेळीपालनात शेळ्या दिवसभर चरण्यासाठी सोडल्यामुळे अतिरिक्त आहाराची तितकीशी आवश्यकता भासत नाही.
अर्धबंदीस्त शेळीपालन
पूर्णत: बंदिस्त शेळीपालन करण्यामध्ये शेळी मरतूकीची शक्यता असते. कारण शेळी हा पूर्वापार पासून फिरणारा प्राणी आहे व शेळीला एकदम बंदिस्त अवस्थेत ठेवणे चूकीचे आहे.यासाठी शेळीला अर्धबंदिस्त अवस्थेत ठेवणे उपयूक्त आहे.काही जाती उदा. बोअर,बारबेरी शेळया पूर्ण बंदिस्त शेळीपालनासाठी योग्य आहेत. शेळी पालनाअगोदर प्रशिक्षण घेणे हितावहच असते.
बंदीस्त शेळीपालन -
शेळीकरीता कमी गुंतवणुकीचे वाडे (गाळे) असावे हेवाडे बास, बल्ली, तट्टे तु-हाटया प-हाटया यांच्या सहायाने करावे. प्रती शेळी किमान 100 ग्रॅम खुराक दयावा प्रत्येक शेळीला किमान दिड ते 2 किलो हिरवा चारा दयावा झाडांची पाने दिल्यास उत्तम विविध झाडांची पाने उदा चिंच, बाभुळ, बोर, पिंपळ, सुबाभूळ, कंदब, निंब इत्यादी
कळपात 20 ते 25 शेळयामागे एक नर असावा.
बंदिस्त शेळीपालन :
शेडची दिशा ठरवताना दक्षिण - उत्तर अथवा पूर्व - पश्चिम ठेवावी. प्रत्येक शेळीला १५ चौ. फुट जागा ठेवावी. गोठ्यांच्या आजूबाजूला चाऱ्यासाठी सुबाभूळ, शेवगा अशी झाडे लावावीत. १५ ते २० माद्यांकरिता प्रजननासाठी एक नर ठेवावा. पिण्यासाठी पाणी शुद्ध असावे. करडे, नुकत्याच व्यायलेल्या शेळ्या, आजारी शेळ्या, गाभन व इतर शेळ्या असे भाग करावेत. शक्य असेल तर शेळीचा चारा टांगून द्यावा. शेळ्यांना १०० ते १५० ग्रॅम खुराक द्यावा लागतो. चाऱ्याचे वार्षिक नियोजन करणे आवश्यकता आहे. कडवळ, गजराज, बरसीम, लसूणघास, मका इ. एकदल व द्विदल पिकांची लागवड करावी. त्याचप्रमाणे वाळलेल्या चाऱ्याकरिता कडबा, गहू, सोयाबीन, तांदळाचा कोंडा, उडदाच्या भुश्याय चा वापर करावा.
बंदीस्त शेळीपालनाची आवश्यकता -
शेळयांची चरण्याची पध्दत इतर गुरांप्रमाणे म्हणजे गाय, म्हैस मेंढी, यापेक्षा वेगळी असून त्या प्रत्येक झाडाचे झुडपाचे कोवळे शेंडे खातात त्यामुळे झाडांची वाढ खुंटते या प्राण्यामुळे जंगलांचा -हास होत आहे असा सर्व साधारण समज आहे व तो काही प्रमाणात खराही आहे जर आपण शेळयांना जंगलात चरण्याकरीता न सोडता त्यांचे बंदिस्त संगोपन केले तर त्यांची झपाटयाने वाढ होते.
बंदीस्त शेळीचे व्यवस्थापन -
शेळीकरीता कमी गुंतवणुकीचे वाडे (गाळे) असावे हेवाडे बास, बल्ली, तट्टे तु-हाटया प-हाटया यांच्या सहायाने करावे
प्रती शेळी किमान 100 ग्रॅम खुराक दयावा प्रत्येक शेळीला किमान दिड ते 2 किलो हिरवा चारा दयावा झाडांची पाने दिल्यास उत्तम विविध झाडांची पाने उदा चिंच, बाभुळ, बोर, पिंपळ, सुबाभूळ, कंदब, निंब इत्यादी
कळपात 20 ते 25 शेळयामागे एक नर असावा
गाभळ शेळयाची व दुभत्या शेळयाची विशेष काळजी ध्यावी
करडांची जोपासना काळजीपुर्वक करावी
दिवसभरात किमान एक वेळा तरी शेळयांचे निरीक्षण करावे आजारी शेळयांना अगक करून पशुवैदयकांच्या सल्यानुसार औषधे दयावीत.
शेळयाबांबत नोंदी ठेवाव्या व्याल्याची तारीख, शेळया फळल्याची तारीख मृत्यूच्या नोंदी इत्यादी
साधारणपणे शेळ्यांना दररोज तीन ते चार किलो हिरवा चारा व एक किलो वाळलेला चारा लागतो. त्याचप्रमाणे शेळ्यांच्या खाद्यामध्ये झाडपाला आवश्यक आहे. त्याचबरोबर गाभण शेळी, दूध देणारी शेळी, पैदाशीच्या बोकडासाठी पूरक आहाराची आवश्यकता अधिक वाचा...
वाढते तापमान आणि कमी पर्जन्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष या बदलत्या हवामानाचा शेळ्या- मेंढ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. सर्वसाधारणपणे शेळ्या- मेंढ्यांचा पैदासकाळ हा पावसाळ्याच्या सुरवातीला येतो; मात्र पैदाशीसाठी सक्षम शरीर यंत्रणा तयार होण्यासाठी उन्हाळी हंगामातच त्यांची काळजी कशी घ्यायची अधिक वाचा...
शेळी ही निसर्गतः काटक व रोगांना कमी बळी पडते; मात्र अनेक कारणांमुळे विविध रोगांचे संक्रमण होऊन शेळीपालन व्यवसायाचे व्यवस्थापन बिघडण्याची दाट शक्यनता असते. शेळी संगोपानामध्ये आरोग्य व्यवस्थापन अधिक वाचा...
माझीशेती मार्फत शेलीपालनाचे संपुर्ण व्यवसाय शोध अहवालापासून मांस प्रक्रिया व निर्यातीबाबत सविस्तर ३ दिवस दररोज २ सत्रांमध्ये प्रशिक्षण दिले जाते. तज्ञ मार्गदर्शक, देशी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची सफर असा प्रशिक्षणाचा भाग आहे. प्रशिक्षणाबाबत अधिक वाचा...
गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी तुम्ही हातभार लावा. प्रकल्प अहवाल बनवुन घ्या. तुम्ही दिलेला निधी गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरला जातो. आमच्या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्या. |
माझीशेतीच्या शेळी पालन ग्रुपमध्ये सहभागी व्हा. |
उपजिविका विकास अंतर्गत 'शेळी पालन' लाभ दिलेले लाभार्थी शेलीसह... |
उपजिविका विकास अंतर्गत 'शेळी पालन' लाभ दिलेले लाभार्थी शेलीसह... |