राज्यात भागिदारी तत्वावर आठ कृषी प्रकल्प होणार... (20151025)
सौजन्य - आरएमएल
राज्यात शेतकरी, शासन आणि खासगी कंपन्यांच्या भागिदारीतून आठ प्रकल्पांचे आराखडे तयार करण्यात शासनाला यश आले आहे. या प्रकल्पांना एकूण साडे अठरा कोटी रुपयांचे सरकारी अनुदान मिळत आहे.
कृषी विभागाच्या सूत्रांनी ‘आरएमएल’शी बोलतांना ही माहिती दिली. या प्रकल्पांमध्ये शेतक-यांकडून 18 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून सार्वजनिक आणि खासगी भागिदारी तत्वावर या प्रकल्पांची उभारणी केली जाईल.
मुख्य म्हणजे राज्यातील एक लाख 40 हजार शेतक-यांचा 3 लाख 28 हजार टन शेतमाल खरेदी करण्यासाठी या प्रकल्पांची आखणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शेतमालाचे उत्पादन ते विक्री व्यवस्था अशी संपूर्ण साखळी या प्रकल्पांमधून हाताळण्याचे उद्दिष्ठ ठेवण्यात आले आहे. हिरवा वाटाणा, मधुमका,भाजीपाला,गुळ,कापूस,कडधान्य आणि सोयबीन अशा पिकांसाठी सदर प्रकल्प तयार होत आहेत.
या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिका-यांच्या मार्गदर्शनासाठी संबंधित जिल्ह्यांमध्ये समित्या स्थापन करण्यात येणार आहेत.
बुलढाणा,अहमदनगरमध्ये हिरवा वाटाणा प्रक्रिया प्रकल्प उभे करण्यासाठी त्रिमूर्ती फुडटेक प्रा.लि आणि एडव्हान्ट लिमिटेड कंपनी पुढे आली आहे. याच कंपन्या अहमदनगर आणि औरंगाबादला मधुमका प्रकल्प उभारणार आहेत.
आकाश एग्रो सोल्युशन प्रा.लि. ही कंपनी जालना,औरंगाबाद, जळगावमध्ये भाजीपाला प्रक्रिया प्रकल्प उभारणार आहे. श्रीकांत एग्रो इंडस्ट्रिज लिमिटेड कंपनी व ग्लोबल एपेक्स एक्झिम कंपनी सातारा, सांगलीत गुळ प्रकल्प उभारत आहे.
यवतमाळच्या कापूस प्रकल्पात एफएफपीआरओ व दयाल कॉटन लिमिटेड कंपनी सहभागी होत आहे. अकोल्याच्या कापूस यांत्रिकीकरण प्रकल्पात जॉन डिअर कंपनीने देखील प्रस्ताव दिला आहे. उस्मानाबाद, लातूर, बीडसाठी कडधान्य प्रकल्पाकरीता रॅलीज इंडिया कंपनी पुढे आली आहे.
सोयबीन प्रकल्पासाठी उस्मानाबाद,लातूर, बीड,बुलढाणा,अकोला, वाशीम,अमरावती तसेच नागपूरची निवड झाली आहे. एडीएम एग्रो इंडस्ट्रिज लिमिटेड कंपनीमार्फत सोयबीन प्रकल्प तयार होतील.
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान :
चळवळ - नाविन्यपुर्ण शेतीची
-----------------------------------
** शेतीच्या बातम्या व इतर अपडेट्स करिता <नाव_गट नं_संपुर्ण पत्ता_जिल्हा_राज्य_मोबाईल नंबर> आम्हाला 09975740444 या नं.वर कळवा.
-----------------------------------
विभागीय कार्यालय - सांगली, रायगड, औरंगाबाद, अकोला, नाशिक, चंद्रपुर
६४७, दसरा चौक, सावळज, जि. सांगली (४१६३११) महाराष्ट्र
www.mazisheti.org
www.fb.com/agriindia
Whatsapp - 9975740444