मनोधैर्य योजना
- बलात्कार पिडीत, लैंगिक शोषण पिडीत बालक आणि हल्ला पिडीतांकरिता मनोधैर्य योजना (महिला आणि बालक)
- बलात्कार आणि हल्ला पिडीतांना (महिला आणि बालक) झालेल्या मानसिक आघातातून सावरणे सर्वात महत्वाचे असते.
- बाधित निवारा, आर्थिक मदत, वैद्यकीय आणि कायदेशीर मदत तसेच समुपदेशन सेवा उपलब्ध करून देणेही महत्वाचे असते.
- पिडीतांना २ लाख रुपयांची आणि विशेष प्रकरणांमध्ये ३ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते.
- पिडीतांचे आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक असा निवारा, समुपमदेशन, वैद्यकीय आणि कायदेशीर मदत, शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते.
माझी कन्या भाग्यश्री योजना
- या उपक्रमातंर्गत मुलींच्या संगोपनासाठी, शिक्षणासाठी, बालविवाहाला प्रतिबंध करण्यासाठी आणि कौशल्ये विकसनासाठी मुलींच्या कुंटुंबियांना आर्थिक प्रोत्साहन देण्यात येईल.
- मातांना पारितोषिक : मुलीच्या संगोपनासाठी, शिक्षणासाठी आणि योग्य पोषणासाठी मुलीच्या पालकांना नियमीतपणे आर्थिक लाभांश देण्यात येतात.
- मुलीकरिता पारितोषिक : वयाच्या १८ व्या वर्षी, मुलीला कौशल्ये विकसनासाठी आणि उच्चशिक्षणासाठी रुपये १ लाख देण्यात येतील जेणे करून भविष्यात तिला रोजगार मिळाविता येईल आणि तिच्या निश्चित उत्पन्नाची सोय होईल, परंतु तो पर्यंत तिचा विवाह झालेला असता कामा नये.
- आजीला पारितोषिक : बहुसंख्य कुंटुंबामध्ये घरातील सासूसासऱ्यांचा मुलगा जन्माला यावा असा आग्रह असतो. यावर तोडगा म्हणून मुलीच्या वडीलांच्या आईला सोन्याचे नाणे तसेच माननीय महिला आणि बालक विकास मंत्र्यातर्फे प्रमाणपत्र देण्यात येईल.
- गावाला पारितोषिक : कोणत्याही गावात जेथे लिंग गुणोत्तर १००० पेक्षा अधिक असेल त्यांना माननीय महिला आणि बालक विकास मंत्र्यातर्फे ५,००.००० रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.
- या योजनेतंर्गत शासन दारीद्र्यरेषेवरील कुंटुंबातील मुलींना रुपये २१,२०० विमा संरक्षण पुरविण्यात येईल.
बाल संगोपन संस्था (सी सी आय)
- महिला आणि बाल विकास विभागाला जाणीव आहे की बालकांचे संरक्षण म्हणजेच बालकांना असलेल्या संभाव्य, वास्तविक वा जिविताच्या तसेच व्यक्तित्व आणि बाल्याला असलेल्या धोक्यापासून रक्षण करणे.
- कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये म्हणून मुलांचा दुबळेपणा कमी करणे आणि एकही मूल सामाजिक सुरक्षा कवचाच्या बाहेर जाणार नाही याची काळजी घेणे.
- जे चुकून सुरक्षा कवच्याचा बाहेर पडतील त्यांना योग्य ते संरक्षण आणि मदत देऊन पुन्हा सामाजिक सुरक्षा कवचात आणणे.
- संरक्षण हा प्रत्येक बालकाचाच मुलभूत अधिकार असला तरी काही मुले अधिक दुबळी असतात आणि त्यांच्याकडे इतरापेक्षा अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असते.
- या मुलांना सुरक्षित वातावरण पुरविण्या बरोबरच इतर मुले देखील संरक्षितच राहतील याची खातरजमा करणे अत्यावश्यक आहे. याचे कारण असे की बालकांच्या इतर सर्व अधिकारांशी बाल संरक्षण हा अधिकार संलग्न आहे.
- या बाबी लक्षात घेऊन विभागाने ११०० पेक्षाही अधिक बाल संगोपन वसतीगृहांचे जाळे तयार केले आहे, जेथे कायद्याचे उल्लघंन करतांना सापडलेली आणि आरोपी बालके तसेच ज्यांची काळजी घेणे अन संरक्षण करणे आवश्यक आहे अशा मुलांची मैत्रीपूर्ण व्यवहाराने योग्य ती काळजी घेतली जाते. त्यांना संरक्षण दिले जाते, त्यांचा विकास, उपचार, सामाजात मिसळणे अशा मुलभूत गरजा पूर्ण केल्या जातात.
- बाल संगोपन केंद्र अत्यावश्यक सेवा आणि आणीबाणीमध्ये पोहचण्यासाठी, संस्थात्मक देखभाल, कुंटुंब, सामाजिक देखभाल यांच्यावर आधारीत आणि मदत सेवा देण्याकरिता आपली संस्थात्मक रचना मजबूत करतात तसेच देश, प्रदेश , राज्य आणि जिल्हापातळीवर कार्यरत असतात.
निराश्रित महिलां, किशोरवयीन माता, अत्याचार पिडीत महिलां यांच्यासाठी राज्य महिला गृहे (वय गट १८ ते ६० वर्षे
- महिलांना वास्तव्याकरिता सुरक्षित आणि संरक्षित वातावरण आणि मुलभूत सुविधा पुरविण्यात येतात.
- पिडितांचे विवाह आणि रोजगार यांच्याद्वारे पुनर्वसन सुनिश्चित केले जाते.
- लाभार्थीचे राज्यात एक महिना वास्तव्य झाल्यानंतर प्रती लाभार्थी १००० रुपये, ५०० रुपये तिच्या पहिल्या मुलांकरिता आणि ४०० रुपये तिच्या दुसऱ्या मुलाकरिता मासिक अनुदान स्वरूपात देण्यात येतात.
+ देवदासी कल्याण योजना
- देवदासींना निर्वाहाकरीता आणि त्यांना व त्यांच्या मुलींना विवाहाकरिता अनुदान देण्यात येते.
- देवदासींच्या मुलांना शालेय गणवेष तसेच इतर शालोपयोगी साहित्य घेण्याकरिता अनुदान देण्यात येते.
- देवदासींच्या मुलांसाठी वसतीगृहाची सोय पुरविण्यात येते.
+ अनाथालय, महिला स्वीकृती केंद्रे आणि संरक्षित गृहे यामधील निराधार आणि परित्यक्ता विधवांच्या मुलींच्या विवाहाकरीता अनुदान
- या योजनेचा शासकीय/बिगर शासकीय सेवाभावी संस्था जसे की राज्येगृहे, अनाथालये, निवारागृहे, माहेर योजनेतंर्गत संरक्षण गृहे आणि बालगृहे येथे राहणाऱ्या, वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या मुलींना लाभ घेता येतो.
- मुलीच्या नावाने रुपये २५,००० चा धनादेश मुलीच्या नावे तिच्या बॅंकेतील खात्यात (राष्ट्रियकृत बॅंकेत) जमा करण्यात येतो, जेणे करून ती विवाहसंबंधीत खर्च करू शकेल तसेच भांडीकुडी इत्यादी विकत घेऊ शकेल.
+ शुभ मंगल सामूहिक विवाह योजना
- निराश्रित आणि विधवांच्या मुलींच्या विवाहाकरिता प्रत्येक विवाहबध्द होणाऱ्या जोडप्याला विवाह पूर्व अनुदान देण्यात येते.
- या योजनेचा लाभ वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या निराश्रित महिला आणि विधवांच्या मुलींना घेता येतो
- अन्य कोणत्याही स्त्रोतातून अनुदान घेणाऱ्या मुलीला या अनुदानाचा लाभ घेता येणार नाही.
+ महिला समुपदेशन केंद्र
अत्याचार पिडितांना (महिला आणि बालक) झालेल्या मानसिक आघातातून बाहेर पडण्यास मदत करण्यासाठी समुपदेशनाची मदत पुरविण्यात येते.
+ अत्याचारग्रस्त पिडीत महिलांसाठी सावित्रीबाई फुले बहूउद्देशीय महिला केंद्र
- अत्याचार पिडीत महिलांना सल्ला आणि मार्गदर्शन पुरविण्यात येते.
- अशा पिडितांकरिता ही केंद्रे मार्गदर्शन आणि कायदेशीर मदतीबाबतीत सल्ला मिळण्याचे तसेच रोजगार आणि व्यावसायिक प्रशिक्षण मिळण्याचे ठिकाण असते.
+ निराश्रित महिलांसाठी आधार गृहे
- आधारगृहे सुरक्षित आणि संरक्षित वातावरण पुरवितात. तसेच अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षा,वैद्यकीय मदत,शैक्षणिक आणि प्रशिक्षण संबंधित सुविधा, कायदेशीर सल्ला आणि इत्यादी मुलभूत सुविधा पुरवितात.
- ३० दिवसांच्या वास्तव्यानंतर पिडीत महिला माहेर योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरतात. विवाह/कौशल्येविकास इत्यादींने पिडितांचे पुनर्वसन करण्यात येते.
+ बाल सल्ला केंद्र
- राज्याने मुलांच्या सर्जनशील क्षमतांच्या विकासासाठी ही केंद्रे स्थापन करुन विविध उपक्रम करण्यासाठी, संधी आणि संवाद साधण्यासाठी, प्रयोग करण्यासाठी, नवनिर्मितीकरिता तसेच त्यांच्या क्षमता आणि आवडीनुसार सादरीकरण करून दाखविण्यासाठी सामायिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
- सध्या झोपडपट्टीमधून अशा प्रकारची केंद्रे उघडण्यात आली आहे, मुंबईत सुरु असणाऱ्या अशा एका केंद्रात ७५ ते १०० बालके आहेत.
+ बाल संगोपन योजना (मुलांसाठी कौटुंबिक देखभाल)
- या उपक्रमातंर्गत ज्या मुलांचे पालक अनेक कारणांमुळे जसे की विकार( दिर्घकालीन आजार), मृत्यू, विभक्त होणे, किंवा एका पालकाने सोडून जाणे किंवा अन्य काही आपत्तीमुळे त्यांची काळजी घेण्यास असमर्थ असतात त्यांना तात्पुरते दुसरे कुंटुंब उपलब्ध करून दिले जाते.
- कुंटुंबाकडून काळजी घेतली जाणे हा प्रत्येक बालकाचा अधिकार असतो म्हणून जोपासना (फ़ॉस्टर) कार्यक्रमातंर्गत मुलाला थोड्या कालावधीसाठी किंवा दिर्घकालावधीसाठी कुंटुंब उपलब्ध करून दिले जाते.
- जोपासना करणाऱ्या पालकांना शासनातर्फे प्रत्येक मुलासाठी त्यांच्या मुलभूत गरजांकरिता ४२५ रुपये मासिक अनुदान सेवाभावी संस्थेमार्फत देण्यात येते. अमंलबजावणी करणाऱ्या सेवाभावी संस्थेला त्या कुंटुंबाला भेटी देणे आणि इतर प्रशासकीय कामाकरिता प्रत्येक मुलासाठी ७५ रुपये मासिक अनुदान देण्यात येते.
+ बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना
- पूर्वग्रहदूषित दृष्टीकोनामुळे होणाऱ्या लिंग निवडीला प्रतिबंध करणे. (स्त्रीभृण हत्यांना प्रतिबंध करणे)
- मुलींच्या जिवीताची आणि संरक्षणाची खातरजमा करणे.
- मुलींच्या शिक्षणाची आणि सामाजिक सहभागाची खातरजमा करणे.
+ काम करणार्या महिलांच्या मुलांकरीता राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघर योजना
- या उपक्रमातंर्गत शाला-पूर्व मुलांना आवश्यक ती प्रबोधनपर खेळणी आणि शैक्षणिक साहित्य पुरविले जाते
+ इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना
- या योजनेचे मूळ उद्दिष्ट गर्भवती आणि स्तनपान कालावधीत महिलांना वेतन नुकसान भरपाई म्हणून रोख रक्कम देणे तसेच त्यांना पोषक आहार उपलब्ध करून त्यांच्या आरोग्याची स्थिती सुधारणे.
- गर्भवती महिलेने नोंदणी केल्यानंतर तिला शासनातर्फे मिळणारे आर्थिक लाभ घेता येतात. शासनाकडून दोन हप्त्यांमध्ये एकूण रुपये ६००० मदत दिली जाते.
- प्रथम प्रसुतीच्यावेळी (रुपये ३०००) आणि बालक सहा महिन्यांचे झाल्यावर (रुपये ३०००) देण्यात येतात.
- सद्यस्थितीत ही योजना अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित आहे.
+ राजीव गांधी सबला योजना
- किशोर वयातील मुलींना स्वयं-विकास आणि सबलीकरणाकरिता सक्षम करणे
- त्यांच्या पोषणाची आणि आरोग्याची स्थिती सुधारणे.
- त्यांच्यामध्ये आरोग्य, स्वच्छता, पोषण, पौगंडावस्थेतील प्रजनन आणि लैंगिक आरोग्य (ए आर एस एच), कुंटुंब आणि मुलांची काळजी याबाबत जाणीव जागृती करणे.
- त्यांच्या गृह कौशल्ये, जीवन कौशल्ये आणि व्यावसायिक कौशल्यांमध्ये सुधारणा करा.
- शालाबाह्य किशोरावस्थेतील मुलींना औपचारीक/ अनौपचारीक शिक्षण देऊन मुख्यप्रवाहात आणणे.
- त्यांना सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र, सामाजिक आरोग्य केंद्र, टपाल कार्यालय, बॅंक, पोलीस ठाणे इत्यादी सार्वजनिक सेवांबाबत माहिती देणे आणि मार्गदर्शन करणे.
- सद्यस्थितीत ही योजना अमरावती, बीड, नांदेड, सातारा, गोंदीया आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये सुरू आहे.
+ किशोरी शक्ति योजना
- किशोर वयातील मुलींना बालविवाहाचे आणि वारंवारं मुलांना जन्म देण्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, तसेच संतुलित आहाराची आणि हिरव्या पालेभाज्या खाण्याची आवश्यकता इत्यादी बाबतचे आरोग्य आणि स्वच्छते संबंधीत शिक्षण तसेच प्रशिक्षण देणे.
- या योजनेतंर्गत किशोरींकरिता ’किशोरी मेळावा’, ’किशोरी आरोग्य शिबीर’ असे विविध प्रकारचे कार्यक्रम अंगणवाडी केंद्र पातळीवर आयोजित केले जातात. ज्या किशोरींना रक्तक्षय झाला असेल अशा मुलींची आर्यन फॉलिक ॲसिडच्या गोळ्या देऊन विशेष काळजी घेतली जाते तसेच त्यांना स्वस्वच्छते विषयी विशेष प्रशिक्षण दिले जाते.
- सद्यस्थितीत ही योजना अहमदनगर, अकोला, औरंगाबाद, भंडारा, चंद्रपूर, धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नंदुरबार, उस्मानाबाद, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सिंधुदूर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये (केवळ २३) सुरू आहे.
+ एकात्मिक बाल विकास सेवा योजना (आय सी डी एस)
या उपक्रमाची व्याप्ती किशोरावस्थेतील मुली, गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांच्यापर्यंत विस्तारण्यात आली आहे.
- पुरक पोषण आहार
- लसीकरण
- आरोग्य तपासणी
- संदर्भ आरोग्य सेवा
- अनौपचारीक शाला-पूर्व शिक्षण
- पोषण आणि आरोग्य शिक्षण