Search here..

Saturday, December 7, 2024

मका पिकाचे व्यवस्थापन

जमीन / माती 

  • मातीचा प्रकार: मध्यम काळी, गाळाची, योग्य निचरा होणारी माती.
  • pH: 5.5 ते 7.5 (तटस्थ ते किंचित आम्लीय).
  • तयारी: चांगल्या नांगरटीनंतर 2-3 कुळवाच्या साहाय्याने जमीन भुसभुशीत करावी.
बियाणे
अ) संकरित वाण : डेक्कन-१o३, १o५, गंगा-११, त्रिशुलता, जे.के. २४९२, प्रो-३१0,३११,३१२, बायो-९६८१, सिडटेक-२३२४, के.एच.९४५१, बायो-९६३७, एच.क्यू.पी.एम-५, सरताज, राजर्षी, एच.क्यू.पी.एम-७
ब) संमिश्र वाण : आफ्रिकन टॉल, मांजरी, किरण, पंचगंगा, करवीर
  • एकरी उत्पन्न: 20-25 क्विंटल (हायब्रीडवर अवलंबून).
  • विशेष बाब: अंकुरण चांगले होण्यासाठी निवडलेल्या बियाण्यांवर प्रक्रिया करावी.
संकरित वाण मका पिकांचे उत्पादन क्विंटल / हेक्टरी
वाणाचे नावउत्पादन (क्विं.)वाणाचे नावउत्पादन (क्विं.)
डेक्कन-10360-65बायो-968170-75
डेक्कन-10565-70सिडटेक-232465-70
गंगा-1155-60के.एच. 945170-75
त्रिशुलता60-65बायो-963765-70
जे.के. 249270-75एच.क्यू.पी.एम-570-75
प्रो-31075-80सरताज60-65
प्रो-31170-75राजर्षी55-60
प्रो-31265-70एच.क्यू.पी.एम-770-75

संमिश्र वाण मका पिकांचे उत्पादन क्विंटल / हेक्टरी :
वाणाचे नावउत्पादन (क्विं.)
आफ्रिकन टॉल50-55
मांजरी55-60
किरण50-55
पंचगंगा60-65
करवीर55-60

मागील पिकाचे बेवड
सोयाबीन, भुईमूग, किंवा हरभरा यांच्या काढणीनंतर मका लागवड करणे फायदेशीर.

आंतरपिके
मका पिकामध्ये खरीप हंगामात काही आंतरपिके घेता येतात. त्यात उडीद, मूग, चवळी, सोयाबीन, भुईमूग, तूर यांचा समावेश होतो.
विशेष काळजी:
बियाण्याला 2 ग्रॅम कॅप्टन किंवा थायरम प्रति किलोने प्रक्रिया करावी.
उगमक्षमता 90% पेक्षा जास्त असावी.

जैविक खत व्यवस्थापन
  • गांडूळ खत: प्रति एकर 2-3 टन.
  • जीवामृत: 200 लिटर प्रति एकर दराने फवारणी.
  • निंबोळी अर्क: मातीमध्ये मिसळल्याने कीड नियंत्रण आणि मातीची उर्वरता सुधारते.
खत व्यवस्थापन
वाढीच्या कालावधीनुसार द्यायचा डोस:
टप्पानत्र (N)स्फुरद (P)पालाश (K)
लागवडीपूर्वी60 किग्रॅ40 किग्रॅ40 किग्रॅ
25-30 दिवसांनी30 किग्रॅ--
45-50 दिवसांनी30 किग्रॅ--

कीड व रोग प्रतिबंधात्मक सापळे
  • फेरोमोन सापळे: फॉल आर्मीवर्मसाठी 5-6 सापळे प्रति एकर.
  • प्रकाश सापळे: संध्याकाळी कीड नियंत्रणासाठी बसवावे.
कीड व रोग नियंत्रण (रासायनिक आणि जैविक)

जैविक उपाय:
  • निंबोळी अर्क 5%.
  • ट्रायकोडर्मा वापरून जमिनीतील रोगांवर नियंत्रण.
रासायनिक उपाय:
  • फॉल आर्मीवर्मसाठी क्लोरँट्रॅनिलिप्रोल 18.5% एससी 150 मिली प्रति हेक्टर फवारणी.
  • पानावरील डागांसाठी कार्बेन्डाझिम 0.1% फवारणी.
काढणी व्यवस्थापन
  • काढणीचा योग्य वेळ: कणसावरील दाणे कठीण झाल्यावर (120-130 दिवसांनी).
  • पध्दत: कणसे हाताने तोडून सावलीत वाळवून भरडणी करावी.
प्रक्रिया उद्योग
  • स्टार्च उत्पादन.
  • अन्नधान्य व पशुखाद्य तयार करणे.
  • औद्योगिक उपयोग (ग्लू, बायोफ्यूल).
शासकीय योजना
  • प्रधानमंत्री पीक विमा योजना: पीक नुकसानीसाठी विमा संरक्षण.
  • राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान: सुधारित बियाणे व खते यासाठी अनुदान.
  • शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम: कृषी विभागाद्वारे तांत्रिक मार्गदर्शन.
माझीशेती योजना 
  • GREET अवॉर्ड 
  • लागणी पासून काढणी पर्यंत मार्गदर्शन 
  • काढणी पश्चात विक्री व्यवस्थापन